उर्मिला मातोंडकर उद्या शिवबंधन बांधणार

बॉलिवुड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर राजकारणातली आपली दुसरी इनिंग खेळण्याच्या तयारीत आहे. राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत शिवसेनेतर्फे शिफारस असलेल्या उर्मिला उद्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवबंधन बांधणार आहेत.;

Update: 2020-11-30 06:57 GMT

लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबई मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने प्रसिध्द अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी मातोंडकर या स्वतः राष्ट्र सेवादल सैनिक असल्याचे जाहीरपणे सांगत होत्या. राजकीय व्यासपीठावरूनही त्या सानेगुरुजी आणि सेवादलाच्या विचारांशी असलेली आपली बांधीलकी पुन्हा जाहीर केली होती. त्यांचे वडील श्रीकांत मातोंडकर हेही समाजवादी चळवळीशी केवळ जोडलेले आहेत. उल्लेखनिय म्हणजे शिवसेनेने राज्यपाल नियुक्त आमदारांसाठीच्या यादीत उर्मिला यांचं नाव राज्यपालांकडे दिलेलं आहे. त्यामुळे त्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यांनी काँग्रेसची उमेदवारी नाकारत शिवसेनेची ऑफर स्विकारली होती.

उर्मिला यांनी काँग्रेसकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर मुंबई उत्तर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना भाजपाच्या गोपाळ शेट्टींकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. निवडणुकीनंतर त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता. दरम्यान, राजकारणातून दूर राहिल्यानंतर वर्षभरानंतर त्या पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहे आणि उद्या त्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले..

महाविकास आघाडीने राज्यपालांकडे शिफारस केलेल्या नावांना राज्यपालांनी अद्याप मंजूरी दिलेली नाही. त्यापूर्वीच शिवबंधन बाधून उर्मिलाची दुसरी राजकीय इनिंग सुरु होत असल्यानं राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Tags:    

Similar News