अजित पवार यांची आज तातडीची बैठक ; कुठल्या मुद्द्यावर होणार चर्चा? वाचा थोडक्यात
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे त्यांनी कार्यकर्यांना या बैठकीसंदर्भात मॅसेज पाठवला आहे. आज होणाऱ्या या बैठकीमध्ये राज्यातील सर्व पदाधिकारी, खासदार, आमदार त्यासोबतच जिल्हाप्रमुखांना सुध्दा या बैठकीला बोलावण्यात आलेलं आहे. ही बैठक ऑनलाईन पध्दतीने घेतली जाणार असून आज सकाळी 11:45 वाजता बैठक होणार आहे.
या बैठकीत अजित पवार हे आपल्या कार्यकर्त्यांना आगामी लोकसभा निवडणूका संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. आगामी निवडणूकीच्या निमीत्ताने ही अत्यंत महत्वाची बैठक असणार आहे, त्यासोबतच राष्ट्रवादीच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय लागणार आहे त्या पार्श्वभूमीवर सुध्दा ही बैठक महत्वाची मानली जात आहे.
येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये अजित पवार गट हा किती जागांवर लढणार आहे, त्याविषयी पूर्वनियोजन कसं असणार आहे याविषयी सुध्दा बैठकीत चर्चा होईल असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.