रिपब्लिकच्या विकास खानचंदानीची दोन दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी...

टिआरपी घोटाळाप्रकरणी रिपब्लिक टिव्हीचा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानीला आज सकाळी अटक केल्यानंतर मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.;

Update: 2020-12-13 13:19 GMT

रिपब्लिक टिव्हीचा संपादक अर्णव गोस्वामी आणि महाविकास आघाडी सरकार यांच्या दरम्यान न्यायालयीन लढाई सुरू असतानाच आज सकाळी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई करत रिपब्लिक टीव्ही चा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानीला अटक केलं होते. त्यानंतर त्याला सीएसटी जवळच्या किल्ला कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयानं विकास खानचंदानीला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. 

ऑक्टोबर महिन्यात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन टीआरपी घोटाळा उघडकीस आणला होता.या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आणि उच्च न्यायालयांमध्ये विविध याचिका प्रलंबित असताना

मुंबई पोलिसांनी आज आणखी मोठी कारवाई केली. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास खानचंदानी यांना मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १३ जणांनी अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी ऑक्टोबरमध्ये बनावट टीआरपी रॅकेटचा पर्दाफाश केला होता. पैसे देऊन टीआरपी वाढण्यात येत असल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

रिपब्लिक वृत्तवाहिनीसह इतर दोन मराठी वाहिन्यांची नावं या प्रकरणात आली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे खानचंदांनी यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे.टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या बरोबरीने 'फक्त मराठी' आणि 'बॉक्स सिनेमा' या दोन वाहिन्यांचा सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मुंबईत जवळपास दोन हजार बॅरोमीटर बसवण्यात आले होते. टीआरपीमध्ये फेरफार करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला. या चॅनलच्यावतीने दर महिन्याला काही जण वेगवेगळया घरांमध्ये जायचे आणि पैसे द्यायचे. लोकांना ही चॅनल्स लावायला सांगितले जायचे', असं पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं होतं.

Tags:    

Similar News