Up Exit poll Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्याशी जोरदार लढत
Up Exit poll Result 2022: उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांची योगी आदित्यनाथ यांच्याशी जोरदार लढत, Exit poll चे आकडे काय सांगतात?;
उत्तर प्रदेश निवडणूकीच्या ७ व्या टप्प्यासाठी आज मतदान पार पडल्यानंतर ५ राज्यांच्या निवडणुकांचे exit poll आले आहेत. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ १४ मे २०२२ रोजी संपत आहे. अशा परिस्थितीत १४ मे पूर्वी विधानसभा आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.
उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. गेली विधानसभा निवडणूक फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये पार पडली होती. गेल्या निवडणूकीत भाजप ३१२ जागा जिंकून सत्तेवर आला. सपा ४७, बसप १९ आणि कॅांग्रेसला ७ जागा मिळाल्या होत्या.
योगी आदित्यनाथ यांनी १९ मार्च २०१७ रोजी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. सीएम योगी हे भाजपचे पहिले मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी उत्तर प्रदेशमध्ये पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.
काय सांगतात Exit Poll
मॅट्रिक्स पोल नुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 262+ जागा मिळतील. दुसरीकडे, सपाला 119-134, बसपाला 7-15 आणि काँग्रेसला 3-8 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
UP: P-MARQ सर्वेक्षणात भाजपला 240 जागा
P-MARQ च्या एक्झिट पोलमध्ये भाजपला उत्तर प्रदेशात 240 जागा मिळताना दिसत आहेत. त्याचवेळी सपाला 140, बसपाला 17, काँग्रेसला फक्त 4 जागा आणि इतर पक्षांना 2 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
TV9- Polstrat सर्व्हेनेही यूपीमध्ये भाजप बहुमताने येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.
TV9 भारतवर्ष आणि Polstrat च्या सर्वेक्षणात उत्तर प्रदेशात भाजपला 211-225 जागांसह बहुमत मिळत आहे, तर सपाला 146-160 जागा मिळत आहेत. दुसरीकडे, या मतदानात इतर पक्षांना केवळ 4-6 जागा मिळाल्याचे दिसून आले आहे. पोलनुसार 14-24 जागा बसपाच्या पारड्यात येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.