केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधी यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट करत लसींच्या तुटवड्याबद्दल केंद्र सरकारवर ‘जुलै सरलं परंतू लसींची कमतरता नाही’ अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील लसीकरणाचे तपशील ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.;

Update: 2021-08-01 11:43 GMT

शुक्रवारी सकाळी राहुल गांधी यांनी ट्विटर वर एक व्हिडिओ पोस्ट करत लसींच्या तुटवड्याबद्दल केंद्र सरकारवर 'जुलै सरलं परंतू लसींची कमतरता नाही' अशी टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी देखील लसीकरणाचे तपशील ट्विट करत प्रत्युत्तर दिलं आहे.

नवनिर्वाचित केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी राहुल गांधी यांचं ट्विट कोट करत, "भारतात जुलै महिन्यात १३ कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. या महिन्यात याला वेग येणार आहे. या कामगिरीबद्दल आम्हाला आमच्या आरोग्यसेवकांचा अभिमान आहे. आता तुम्हाला त्याचा आणि देशाचा अभिमान वाटला पाहिजे." असं म्हटलं आहे.

याशिवाय त्यांनी "मी ऐकले आहे की जुलै महिन्यात लसीकरण झालेल्या १३ कोटी लोकांपैकी तुम्ही देखील एक आहात. परंतु तुम्ही आमच्या शास्त्रज्ञांसाठी कौतुकाचा एक शब्दही बोलला नाही, जनतेला लसीकरण करण्याचे आवाहन केले नाही. याचा अर्थ तुम्ही लसीकरणाच्या नावावर क्षुल्लक राजकारण करत आहात. खरंतर लसींची नाही, आपल्याकडे परिपक्वतेची कमी आहे." अशा कठोर शब्दात टीका केली.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार लसींचे ४७ कोटी डोस आतापर्यंत नागरीकांना देण्यात आले आहेत. शिवाय १६.४ कोटी पेक्षा अधिक लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. परंतू भारताची एकूण लोकसंख्या पाहता हा आकडा इतर देशांच्या तुलनेत फारच कमी आहे.

Tags:    

Similar News