Uddhav Thackeray : मी दुकान बंद करणार नाही, शिवसेना वाढवायची आहे

facebooktwitter-greylinkedin
Update: 2022-07-27 04:30 GMT
Uddhav Thackeray : मी दुकान बंद करणार नाही, शिवसेना वाढवायची आहे
  • whatsapp icon

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार कोसळल्यानंतर सामनाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीत भाजपसह बंडखोरांवर जोरदार हल्ला केला आहे. सामनाचे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या या मुलाखतीच्या पहिल्या भागात उद्ध ठाकरे यांनी भाजपवर प्रहार केला. तर मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी आगामी काळातील रणनीती काय असेल ते स्पष्ट केले आहे. विरोधकांची देशव्यापी आघाडी तयार होणे गरजेचे आहे, पण त्याचबरोबर त्या आघाडीत पदासाठी वाद नको अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपण शिवसैनिकाल मुख्यमंत्री करण्याचा शब्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिला होता, तो पूर्ण झाल्यानंतरही आपण दुकान बंद करणार नाही, शिवसेना वाढवणार आहोत, असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. 

Full View

Tags:    

Similar News