उद्धव ठाकरेंचं पक्षप्रमुख पद जाणार...?

Update: 2023-01-11 17:05 GMT

उद्धव ठाकरे यांचे टेंन्शन वाढलं...पक्ष प्रमुखपदाचा कार्यकाळ २३ जानेवारीला संपणार...

एकीकडे शिवसेना पक्ष नेमका कुणाचा? यावरुन वाद सुरु असताना आता ठाकरे गटाचे टेंन्शन वाढवणारी नविन बातमी समोर आली आहे. कारण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पदाचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे आता पक्षप्रमुखांचे काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. २३ तारखेला उद्धव ठाकरे यांची संघटनात्मक प्रमुख पदाची मुदत संपत आहे. तर संघटनात्मक निवडणुकीसाठी ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे विनंती केली आहे.

निवडणुक आयोगासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची कायदेशीर लढाई सुरु आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदाचा कार्यकाळ संपत आहे. २३ जानेवारी २०१८ मध्ये कार्यकारणीच्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुखपदी निवड करण्यात आली होती. ही निवड ५ वर्षासाठी असते. ही मुदत २३ जानेवारी २०२३ रोजी संपत आहे. निवडणुक आयोग यावर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून राहिले आहे.


Full View

Tags:    

Similar News