BJP shivsena Alliance: 30 वर्ष एकत्र राहून काही झालं नाही, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये झालेल्या भेटीनंतर आता भाजप आणि शिवसेनेची जवळीक वाढली असल्याचं बोललं जात आहे. (Uddhav Thackeray on BJP shiv sena Alliance) यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आज पत्रकारांनी प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मी या दोघांच्या मध्ये आहे. (बाळासाहेब थोरात Balasaheb Thorat आणि अजित पवार Ajit Pawar) निघायचं म्हटलं तर निघायचं म्हटलं तर कुठल्या बाजून निघायचं सांगा? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना विचारला तसंच पुन्हा एकदा पत्रकारांनी भाजप शिवसेना एकत्र येणार का? हा सवाल विचारला यावर उद्धव ठाकरे यांनी 30 वर्ष एकत्र राहून काही झालं नाही आता काय होणार? असा सवाल करत भाजप शिवसेना एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केलं आहे.