भुजबळांसारखाच गुन्हा मातोश्रीनेही केला, पण तुरुंगात का नाही? राणेंचा प्रहार
राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठाकरे विरुद्ध राणे संघर्ष सुरू झाला आहे. मुंबई महापालिकेची नोटीस नारायण राणे यांना आल्यानंतर राणेंनी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकीकडे संजय राऊत विरुद्ध किरीट सोमय्या यांच्यात आरोप-प्रत्यारोप रंगले असताना आता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत. राणे यांनी शनिवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोप केले.
छगन भुजबळ ज्या गुन्ह्यासाठी अडीच वर्षे तुरुंगात गेले तोच गुन्हा मातोश्रीने केला आहे, पण ते तुरुंगात का गेले नाही, असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला आहे. तसेच आपण EDपर्यंत सगळी माहिती पोहोचवली आहे, भुजबळ अडीच वर्ष तुरुंगात गेले. तसेच गुन्हे मातोश्रीने केले आहेत, त्या दोघांचा CAसुद्दा एकच आहे, असा दावा राणेंनी केली. या प्रकरणात आपल्या एवढी माहिती कुणालाही नाही, आपण इन्कम टॅक्समध्ये काही वर्ष काम केले आहे, असा टोला राणेंनी लगावला.
यावेळी नाराण राणे यांनी सुशांत सिंह आणि दिशा सालियान यांची हत्याच झाली, असा आरोपा पुन्हा केला. तसेच दिशा सालियानचा बलात्कार झाला तेव्हा पोलीस सुरक्षा कुणाची होती, सुशांत सिंहचे मारेकरी कोणत्या मंत्र्याच्या गाडीतून गेले असा सवाल राणेंनी उपस्थित केला. त्याचबरोबर आपल्याकडे यासंदर्भातले सर्व पुरावे उपलब्ध आहेत आणि योग्यवेळी ते सीबीआयला देऊ असेही नारायण राणे यांनी यावेळी सांगितलेय.