पावसाळी अधिवेशनाचे सूप वाजले, पुढील अधिवेशन कधी?

अधिवेशनात किती कामकाज झाले?

Update: 2021-07-06 14:55 GMT

कोरोनामुळे पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच ठेवण्यात आला होता. या दोन दिवसीय अधिवेशनात एकूण 10 तास 10 मिनिटं कामकाज झालं. अन्य कारणांमुळं 1 तास 25 मिनिटं वाया गेली. रोजच्या कामाची सरासरी काढल्याल 5 तास 10 मिनिटं काम झालं.

या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. लोकांची मतं जाणून घेण्यासाठी 3 विधेयकं परिसृत करण्यात आली. नियम 47 अन्वये दोन निवेदनं देण्यात आली आहेत. एकूण 4 शासकीय ठराव घेण्यात आले. तसंच शोकप्रस्ताव व पुरवणी मागण्यावर चर्चा झाली.

महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन 7 डिसेंबर 2021 ला नागपूर येथे होणार आहे.

Full View

Tags:    

Similar News