सोशल मिडीयावर रंगला रामदास आठवलेंचा इंग्रजी क्लास

तेवीस इंग्रजी पुस्तकांचे लेखक आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडल्यानंतर सोशल मिडीयावर जोरदार खळबळ झाली आहे. विनोदी भाषणांसाठी ओळखले जाणाऱ्या रामदास आठवलेंनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली. मात्र, त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही चिमटा काढला आहे. शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या संवादाचे ट्वीटस व्हायरल झाले आहेत.;

Update: 2022-02-11 04:21 GMT

 तेवीस इंग्रजी पुस्तकांचे लेखक आणि इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वासाठी ओळखले जाणारे काँग्रेस नेते शशी थरूर यांची इंग्रजीतील चूक केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पकडल्यानंतर सोशल मिडीयावर जोरदार खळबळ झाली आहे. विनोदी भाषणांसाठी ओळखले जाणाऱ्या रामदास आठवलेंनी लक्षात आणून दिलेली चूक शशी थरूर यांनी मान्य केली. मात्र, त्यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनाही चिमटा काढला आहे. शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यात झालेल्या संवादाचे ट्वीटस व्हायरल झाले आहेत.

कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी ट्वीट करताना फोटो पोस्ट केला होता. या फोटोत अर्थमंत्री निर्मला सीतारमण या लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत बोलताना दिसत आहे. त्याच वेळेस त्यांच्या मागे बसलेले रामदास आठवले यांनी भावमुद्रा ही निर्मला सीतारमण आश्चर्यजनक सांगत असल्यासारखी होती. त्यावर शशी थरूर यांनी ट्वीट केले आहे. शशी थरूर यांनी म्हटले की, अर्थसंकल्पावर झालेल्या चर्चेवर अर्थमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर केंद्रीय मंत्र्यांनादेखील विश्वास वाटत नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव सांगून जात असल्याचे थरूर यांनी म्हटले आहे.

या ट्विटला केंद्रीय मंत्री आठवले यांनी उत्तर दिले आहे. "प्रिय शशी थरूर जी, असे म्हणतात की अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच. इथे 'Bydget' नाही तर BUDGET होईल आणि rely ऐवजी 'reply' होईल! पण आम्ही समजू शकतो!" असे आठवले यांनी म्हटले होते.

रामदास आठवले यांनी पकडलेली चूक थरूर यांनी मान्य केली. पण थरूर यांनी सीतारमण यांनाही चिमटा काढला. थरूर म्हणाले की, निष्काळजीपणे टाइप करणे हे वाईट इंग्रजीपेक्षा अधिक वाईट असल्याचे सांगत थरूर यांनी म्हटले की, जेएनयूमधील एकाला तुमच्या शिकवणीचा फायदा होऊ शकतो .

शशी थरूर आणि रामदास आठवले यांच्यातील संवादाचे ट्विट व्हायरल झाले असून त्यावर अनेक प्रतिक्रीया येत आहेत. 

Tags:    

Similar News