बिहारमध्ये काँटे की टक्कर, तेजस्वी मॅन ऑफ द मॅच

Tuff fight in Bihar election, Tejaswi yadav will be main of match;

Update: 2020-11-10 15:12 GMT

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चुरस आता आणखी वाढलेली आहे. दिवसभर भाजपप्रणीत एनडीएने आघाडी घेतली असली तरी संध्याकाळनंतर तेजस्वी यादव यांनी भाजपची आणि जेडीयूला आव्हान देत निकालाची चुरस मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे. तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने 70 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतल्याने ही लढत काँटे की टक्कर म्हणून पाहून पाहिली जाऊ लागली आहे.

निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी तेजस्वी यादव यांचं नेतृत्व या निवडणुकीच्या निमित्ताने प्रस्थापित झालेले आहे. वडील लालूप्रसाद यादव यांचा उल्लेखदेखील तेजस्वी यादव यांनी या निवडणुकीत केला नाही. पण नितीशकुमार यांच्याविरोधात मात्र तेजस्वी यादव यांनी मोठ्या प्रमाणात रान उठवले.

संध्याकाळपर्यंत आलेल्या कलानुसार भाजपच्या जागा वाढल्या असल्या तरी नितीशकुमार यांना मात्र काही जागा गमवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे बिहारमध्ये आता भाजप मोठ्या भावाच्या रूपात पुढे आलेला आहे. त्यामुळे उद्या एनडीएची सत्ता आली तर भाजप मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर दावा सांगणार का अशी चर्चा देखील सुरू झालेली आहे. पण प्रचारादरम्यान भाजपने जास्त जागा मिळाल्या तरी नितीशकुमार मुख्यमंत्री होणार असे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि नितीश कुमार यांच्यात वाद होणार नाही अशी शक्यता दिसते आहे. पण मतमोजणी मध्ये काँटे की टक्कर असल्याने बिहारच्या तख्तावर कोण बसणार हे समजायला अजून काही वेळ जावा लागणार आहे.

Tags:    

Similar News