भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री 4 महिन्यात राजीनामा देण्याच्या तयारीत, काय आहे कारण?

Update: 2021-07-02 15:50 GMT

मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत अचानक दिल्लीला पोहोचले आहेत. ते राजीनामा देणार असल्याचं समजतंय. दिल्लीला जाण्यापुर्वी त्यांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटायला जात असल्याचं सांगितलं. त्याचं पद संवैधानिक संकटात अडकलं आहे.

तिरथ सिंह यांनी उत्तराखंड चा कारभार हातात घेऊन चार महिने झाले आहेत. त्यामुळं तिरथ सिंह यांना 10 सप्टेंबर पुर्वी विधानसभा सदस्य होणं गरजेचं आहे. त्यातच आता निवडणूक आयोगाने पोटनिवडणूकीवर बंदी घातली आहे. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला आहे.

तीरथ सिंह रावत यांनी मार्च महीन्यात उत्तराखंड चा कारभार हाती घेतला होता. माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून त्यांनी कारभार आपल्या हाती घेऊन 4 महिनेच झाले आहेत. तर दुसरीकडे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी 4 वर्ष राज्याचा कारभार पाहिला. पुढच्या वर्षी राज्यात निवडणूका होत असल्यानं पक्ष कोणताही जोखीम घेऊ इच्छित नाही. म्हणून तर तिरथ सिंह यांचा राजीनामा घेतला जात असल्याचं देखील बोललं जात आहे.

तज्ज्ञांच्या मते पोटनिवडणुकीसाठी सेफ सीट हवी असल्याने त्यांनी दिल्ली गाठल्याचं बोललं जात आहे. दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेणार आहेत.

काय आहे प्रकरण?

तीरथ सिंह रावत सध्या लोकसभा सदस्य आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदावर राहण्यासाठी त्यांना विधानसभा निवडणूक लढावी लागणार आहे.

राज्यात गंगोत्री आणि हल्द्वानी सीटवर पोटनिवडणूक होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाच्या मते मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत यांनी गंगोत्री मधून निवडणूक लढवावी. मात्र, पक्षातील एक गट मुख्यमंत्र्यांसाठी एक सेफ जागा हवी म्हणून आग्रही आहे. आणि ही जागा तीरथ सिंह यांचं होमटाऊन चौबट्टाखाल ही आहे.

Tags:    

Similar News