देशाच्या पूर्वोत्तर भागात मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचे पडसाद आज थेट राज्याच्या विधिमंडळामध्ये उमटले.. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरही या लांच्छनास्पद घटनेचा निषेध करण्यात आला त्यानंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर हा मुद्दा विरोधी पक्षाने विधानसभेत उपस्थित केला परंतु विधानसभा अध्यक्षांनी त्यावरील चर्चा नाकारली अखेर सभात्याग झाला. गोंधळातच प्रश्नोत्तराचा तास पूर्ण झाला.
इर्शाळगडाच्या घटनेत बाबत विरोधकांनी माहिती देण्याची सरकारकडे मागणी केली. औचित्याचे मुद्दे आणि लक्षवेधीसह विरोधकांच्या प्रस्तावाने आज दिवसाचे अखेर होईल.. पण दिवसभराच्या कामकाजाचा नेमका मतितार्थ काय? पहा मॅक्स महाराष्ट्राचे तिसरं सभागृह..