लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात निवडणूकांची जोरदार धुमश्चक्री सुरू आहे. राज्यातल्या मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांकडून निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची नावे जाहीर केली जात आहेत. राष्ट्रवादी शरद पवार गटाने यापूर्वी आपल्या उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या केल्या असून आज(बुधवारी) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. यामध्ये सातारा आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पोस्ट शेअर करत सदरील उमेदवारांची यांदी जाहीर केली आहे. त्यानुसार सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे तर रावेर मधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे आज भाजप पक्षाकडूनही साताऱ्यातील उमेदवाराच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान ३० मार्च आणि ४ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी सात उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. त्यामध्ये वर्धातून अमर काळे, दिंडोरीमधून भास्करराव भगरे, बारामतीमधून सुप्रिया सुळे, शिरूरमधून अमोल कोल्हे, अमहमदनगरमधून निलेश लंके बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar party has announced the third list of candidates for the Lok Sabha Elections 2024.
— Nationalist Mahila Congress - Sharadchandra Pawar (@NCP_NMCspeaks) April 10, 2024
Congratulations and All the best!@PawarSpeaks @supriya_sule@DrFauziaKhanNCP @Jayant_R_Patil @NCPspeaks @shindespeaks pic.twitter.com/Sc9pyEakYx