मंत्रीमंडळाचा विस्तार शिंदे-फडणवीस सरकार करू शकत नाही - बाळासाहेब थोरात
शिंदे-फडणवीस हे दिल्लीला जरी जाऊन आले असले तरी आता 40 लोकांना मंत्री करणे शक्य नाही. असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले आहे. त्यांच्या ४० आमदारांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे विस्तार होणे शक्य नाही असेही ते म्हणालेत. अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकारने जनतेची सेवा केली व आता आपल्या कामांवर शिंदे भाजप सरकार जनतेकडे मते मागू शकत नाही. कोणताच मुद्दा नसल्याने राज्यात अफवा उठवण्याचे काम सुरू असल्याचेही बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरात सांगितले आहे.
हे हि पहा...