पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा, नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांचं समर्थन

Update: 2024-06-06 09:55 GMT

पुणे - लोकसभा सार्वत्रिक निवडणुका २०२४ चे निकाल समोर आले आहेत. देशभरामध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. यामुळे सरकार कोणाचे स्थापन होणार याची चर्चा मोठ्या प्रमाणात होती. एन.डी.ए चे घटक असणारे नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाकडे बहुमताला लागणारी खासदारांची संख्या असल्याने यांच्या पाठिंब्याचा निर्णय हा महत्त्वपूर्ण होता. एन.डी.ए चे घटक पक्ष असून देखील काँग्रेस आणि इंडिया आघाडीशी चर्चा चालू असल्याच्या बातम्यांमुळे नेमकं सरकार कोणाचं येणार, पंतप्रधान कोणाचा होणार या चर्चांना वेग आला होता.

मात्र नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) व चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टी हा पक्ष एन.डी.ए चा घटक पक्ष आसुन आम्ही एन.डी.ए सोबतच असणार आहोत. अशी भूमिका आता नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू यांनी स्पष्ट केली आहे. या दोनही नेत्यांनी आपल्या खासदारांच्या समर्थनाचे पत्र देखील दिले आहे. या मुळे नरेंद्र मोदीं यांचा पुन्हा पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशात भाजप ला २४० जागा मिळाल्या असून, एन.डी.ए गटबंधन आणि मित्र पक्ष यांनी सरकार स्थापनेसाठी लागणारी २७२ खासदाराची बहुमताची संख्या पार केली आहे. या मुळे एन.डी.ए चाचं पंतप्रधान होणार हे चित्रं स्पष्ट झालं आहे. या मध्ये नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) यांना १२ जागा तर चंद्रबाबू नायडू यांच्या तेलगू देशम पार्टी या पक्षाला १६ जागा मिळाल्या आहेत. सरकार स्थापनेसाठी लागणारी निर्णयात्मक सदस्य संख्या ही नितीश कुमार व चंद्रबाबू नायडू या नेत्यांकडे होती. म्हणून यांचं महत्त्व वाढलं होतं. काँग्रेस आणि इंडिया आघाडी ने या नेत्यांशी सरकार स्थापनेच्या संदर्भात, समर्थनासाठी चर्चा सुरू केली होती. अशा बातम्या समोर येत होत्या. मात्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी आपलं समर्थन एन.डी.ए सोबतच आहे. हे स्पष्ट करत समर्थांचे पत्रही दिले आहे.

Tags:    

Similar News