देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे पंतप्रधान मोदी च्या हस्ते हस्तांतरण संपन्न.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकल्पातील प्रस्तावित ३०,००० घरांपैकी २१,००० घरे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १५,०२४ घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत. घराबरोबरच नागरिकांना परिसरात वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्याच्या विशेष व्यवस्था, शिक्षणाच्या सुविधा अशा अनेक सुविधा देखील निर्माण करून देण्यात येणार आहेत..

Update: 2024-01-19 12:10 GMT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तब्बल ३०,००० सदनिकांच्या, देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचे नगर, कुंभारी, सोलापूर येथे हस्तांतरण संपन्न झाले. केंद्र आणि राज्य सरकारच्या अनुदानातून हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पाचे लाभार्थी असंघटित क्षेत्रातील गरजू, बिडी कामगार, बांधकाम कामगार, गारमेंट कामगार आणि कापड कामगार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात काही लाभार्थ्यांना घराच्या चाव्या सुपूर्द करण्यात आल्या..प्रकल्पातील प्रस्तावित ३०,००० घरांपैकी २१,००० घरे यशस्वीरित्या पूर्ण झाली आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १५,०२४ घरे लाभार्थ्यांना सुपूर्द करण्यात आली आहेत.




घराबरोबरच नागरिकांना परिसरात वीजपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा, अंगणवाडी, पाणीपुरवठ्याच्या विशेष व्यवस्था, शिक्षणाच्या सुविधा अशा अनेक सुविधा देखील निर्माण करून देण्यात येणार आहेत..यावेळी राज्यपाल श्री.रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार डॉ.जय सिद्धेश्वर महास्वामी, आमदार श्री.सचिन कल्याणशेट्टी, मुख्य सचिव श्री.नितीन करीर, केंद्रीय गृहनिर्माण सचिव श्री.मनोज जोशी, विभागीय आयुक्त श्री.सौरभ राव, जिल्हाधिकारी श्री.कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शितल तेली उगले, पदाधिकारी लाभार्थी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




 


Tags:    

Similar News