भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या सूनबाईने केले मारहाणीचे खळबळजनक आरोप...!

Update: 2024-04-11 15:29 GMT

राज्यात लोकसभा निवडणूकीचा धुमाकूळ चालू आहेत अशातच वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपाकडून उमेदवारी मिळालेले उमेदवार रामदास तडस(Ramdas Tadas) यांच्या विरोधात त्यांची सूनबाई पूजा तडस(Pooja Tadas) या लोकसभेच्या निवडणूकीसाठी अपक्ष म्हणून लढणार आहेत. याच दरम्यान पूजा तडस यांनी आपले सासरे असलेल्या रामदास तडस यांच्यासह कुटूंबावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आज घेतलेल्या परिषदेत पूजा तडस बोलत होत्या.

यासंदर्भात बोलताना पूजा तडस म्हणाल्या की, मला एका प्लॅटमध्ये टाकलं, तिथे मला ज्याप्रकारची वागणूक देण्यात आली, ती अतिशय अपमानास्पद होती. ज्या प्लॅटमध्ये मी राहते, तिथे फक्त एक उपभोगाची वस्तू म्हणून माझा वापर केला गेला. मला बाळ झालं त्यावेळी तडस परिवाराकडून हे बाळ कुणाचं? असं विचारण्यात आलं. या बाळाची डीएनए टेस्ट कर, असं सांगण्यात आलं. प्रत्येकवेळी मला अवमानजनक वागणूक देण्यात आली. वारंवार माझ्यावर नको नको ते आरोपी लावण्यात आले.

दरम्यान, ज्यावेळी मी त्यांच्या घरी गेले होते, त्यावेळी मला लोखंडी रॉडने देखील मारहाण करण्यात आली. याचे पुरावे मी सर्वांना देणार आहे. मी ज्या प्लॅटमध्ये राहते, तो प्लॅट विकून मला बेघर करण्यात आलंय. एका स्ञीवर तुम्ही इतके अत्याचार करता...! इतक्या खालच्या पातळीचं राजकारण घडतंय. मग माझ्यासारख्या मुलीने कुठे जायचं? असा संवेदनशील प्रश्न पूजा तडस यांनी यावेळी उपस्थित केला.

रामदास तडस यावर काय म्हणाले?

सूनबाईने रासदास तडस यांच्यावर आरोप केल्यानंतर यावर प्रतिक्रिया देत रामदास तडस म्हणाले की, निवडणूका आल्यावर गंभीर आरोप होतात. त्यांचे न्यायालयात यासंदर्भात केस सुरू आहे. मुलगा आणि मुलीने लग्न केलं हे देखील मला माहित नाही. माझा यामध्ये काहीही संबंध नाही. ती आता आमच्यासोबत रहात नाही. तिने तिच्या नवऱ्यासोबत रहावं. याविषयी न्यायालयात केस चालू आहे त्यामूळे मला याचं काही देणं-घेणं नाही. त्यांनी त्यांचं आता पुढं बघून घ्यावं, अशा शब्दात रामदास अडस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पती पंकज तडस काय म्हणाले?

पूजा तडस यांचे पती पंकड तडस यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया देत बाजू मांडली आहे. ते म्हणाले, माझा विवाह रद्द करण्यासाठी मी न्यायालयात दाद मागितली आहे. न्यायालयात देखील हे मुद्दे मांडण्यात आले आहेत. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने मी यावर जास्त काही बोलू शकत नाही. विरोधी नेत्यांना हाताशी घेऊन यांचा फक्त माध्यमांत प्रसिध्दी मिळवणं आणि तडस कुटूंबियांना बदनाम करणं हाच डाव आहे. माझ्या घराला आणि कुटूंबियांना फसवण्याचा हा प्रयत्न आहे, असं पंकज तडस यांनी म्हटले आहे. 

Tags:    

Similar News