चक्का जाम आंदोलनामुळे पेट्रोल-डिझेलची बचत झाली;बागडेंचा अजब दावा
बागडेंच्या या अजब दाव्याची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे....;
औरंगाबाद: ओबीसिंच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीसाठी भाजपकडून शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं. मात्र याच आंदोलनात बोलतांना भाजपचे जेष्ठ नेते आणि आमदार हरिभाऊ बागडेंनी अजब दावा केला आहे.
भाजपच्यावतीने ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्याच्या मागणीसाठी राज्यभर जे चक्का जाम आंदोलन करण्यात आले त्यामुळे, राज्यभरात पेट्रोल-डिझेलची बचत झाली असल्याचा अजब दावा बागडे यांनी आंदोलनादरम्यान केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
बागडे यांनी आपल्या फुलंब्री मतदारसंघातील महात्मा फुले टी पॉईंट येथे करण्यात आलेल्या आंदोलनात सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी भाषण करताना राज्य सरकारवर टीका केली.