बाबा कालीचारणला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी

धर्मसंसदेमधे महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण यांना काल ठाणे येथील नौपाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर केले होते. कालीचरण यांना रायपूर येथून ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.;

Update: 2022-01-21 08:33 GMT

धर्मसंसदेमधे महात्मा गांधी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या कालीचरण यांना काल ठाणे येथील नौपाडा पोलिसांनी अटक केल्यानंतर केले होते. कालीचरण यांना रायपूर येथून ताब्यात घेऊन आज कोर्टात हजर केले जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी देखील या कालीचरण महाराज यांना अटक व्हावी यासाठी लेखी तक्रार केली होती. याच तक्रारीवरून कालीचरण यांना रायपूर येथून अटक करण्यात आली. कालीचरण महाराज यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याविरोधात बेताल आणि आक्षेपार्ह विधाने केली होती. या कालीचरण महाराज यांना अटक करण्यात यावी, अशी लेखी तक्रार आव्हाड यांनी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीनंतर नौपाडा पोलिसांनी जयपूर येथून कालीचरण महाराज यांना ताब्यात घेतले. त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं.

पोलिसांनी कोर्टात दोन दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. कालीचरण यांच्याकडून आजच जमीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. या जामीन अर्जावर सोमवारी न्यायालयात निर्णय होणार आहे. ठाणे कोर्टने कालीचरण बाबाला 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी बाबा कालीचरणची रवानगी रायपूर जेल मध्ये केली आहे. पोलिसांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी मागितली परंतु न्यायालयाने त्यांची न्यायालयान कोठडीत रवानगी केली. कालिचरण याच्या समर्थनार्थ बजरंग दल संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Tags:    

Similar News