मराठवाडा पाणी टंचाईग्रस्त जिल्ह्यांचा प्रश्न मिटवण्यासाठी पर्याय शोधा: जयंत पाटील
मराठवाड्यात सातत्याने दुष्काळ पडत आहे. मराठवाड्यातील पाण्याची तीव्र अडचण लक्षात घेता. या भागातील पाण्याचा प्रश्न मिटावा म्हणून मराठवाड्यातील पाणी टंचाई असणाऱ्या जिल्ह्यांचा, तालुक्यांचा अभ्यास करण्यात येणार असल्याचं राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले आहे. या संदर्भात त्यांनी संबधित अधिकाऱ्यांना आज निर्देश दिले आहेत. .
jayant patil take review meeting on water shortage in marathwada
सिल्लोड तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मिटणार?
सिल्लोड तालुक्यातील जलसंपदा विभागाच्या विविध प्रश्नांबाबत आज महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सोबत मंत्रालय एक बैठक पार पडली.
या बैठकीत भराडी बृहत लघू पाटबंधारे संदर्भात सर्वेक्षण करण्याबाबत चर्चा झाली. त्याचे सर्वेक्षणाचे काम लवकर पूर्ण करावे, असे निर्देश जयंत पाटील यांनी यावेळी दिले आहे..
लघू प्रकल्पाचं काय?
या भागातील अजिंठा, अंधारी मध्यम प्रकल्प, सोयगाव लघु प्रकल्पातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी, सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीबाबत, खेळणा मध्यम प्रकल्पाची उंची वाढविणे, व या तालुक्यातील नविन सिंचन प्रकल्पाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
पाणी उपलब्धतेनुसार नवीन सिंचन प्रकल्पासाठी सर्वेक्षण करण्यात यावे. तसेच सिल्लोड विश्रामगृह, खेळणा विश्रामगृह व सिल्लोड कार्यालय दुरुस्ती करणेबाबत कार्यवाही करण्यात यावी अशी चर्चाही बैठकीत करण्यात आली.