एट्रॉसिटी कायद्याबाबत अयोग्य वक्तव्य करुन सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी मागणी पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी म्हटले आहे. विधिमंडळ सदस्यच जर कायद्याची पायमल्ली करत असतील तर त्यांना एक क्षणसुद्धा विधिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, असे कवाडे यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर मातोश्रीला आणि शिवसेना पक्षाला बदनाम करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ आपल्या पक्षातून निलंबित करावे, अशी मागणी जोगेंद्र कवाडे यांनी केली आहे. खामगाव तालुक्यातील अंबिकापूर तेथील कुटुंबाची जोगेंद्र कवाडे यांनी भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
आमदार संजय गायकवाड यांनी दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वक्तव्याचा निषेध आहे. पक्षाला बदनाम करणारे आमदार उद्धव ठाकरे यांना पक्षात का पाहिजेत असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना पत्रकारांच्या माध्यमातून विचारला आहे. कुणी जर एट्रॉसिटीचे खोटे गुन्हे दाखल करत असतील तर तुम्ही चोरीचे गुन्हे दाखल करा, असे वादग्रस्त वक्तव्य संजय गायकवाड यांनी केले होते.