शेठ तुम्ही नादच केलाय थेट, सुषमा अंधारे यांचा भरत गोगावलेंना टोला

Sushma Andhare News: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे Active झाले आहेत. त्यातच आज रायगड जिल्ह्यातील महाड येथे उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा झाली. यामध्ये सुषमा अंधारे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीकास्र सोडले.;

Update: 2023-05-06 14:08 GMT

Sushma Andhare News: राज्यात सत्तांतर झाल्यानंतर उद्धव ठाकरे Active झाले आहेत. त्यातच आज रायगड जिल्ह्यातील महाड येथे उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा झाली. यामध्ये सुषमा अंधारे यांनी भरत गोगावले यांच्यावर टीकास्र सोडले.

गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे (Sushma Andhare) शिंदे गटातील आमदारांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहेत. त्यातच आज सुषमा अंधारे यांनी रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड येथे झालेल्या सभेत बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांच्यावर निशाणा साधला.

यावेळी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, आपण शेठ नेमकं कुणाला म्हणतो. याचा विचार केला पाहिजे.लूट करणाराला शेठ म्हटलं जातं. त्यामुळे 50 खोके वाल्यांनी जी लूट केली त्याचं उत्तर द्यायचं आहे. कारण या शेठचा MIDC मध्ये वसूलीचा दर ठरला आहे. आधी हा शेठ 10 टक्के घ्यायचा. आता मुलगा आधी 7 टक्के आणि काम झाल्यानंतर 7 टक्के वसुली करतो, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

पुढे बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, शेठ तुम्ही नादच केला थेट आणि या भागाची केलीय लूट असा टोला सुषमा अंधारे यांनी भरत गोगावले यांचं नाव न घेता केला.

Tags:    

Similar News