सुनेत्रा पवार-सुप्रिया सुळे; नणंद विरुध्द भावजय आमने सामने

सध्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नि सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या दोन्ही नणंद-भावजय एकत्र मैदानात उतपल्या आहेत.

Update: 2024-02-24 08:00 GMT

यावर्षी बारामतीमधील लोकसभेच्या राजकारणावर सध्या सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. याचे कारणही तसंच आहे, सध्या बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नि सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे या दोन्ही नणंद-भावजय एकत्र मैदानात उतपल्या आहेत. त्यामूळे बारामतीत मतदार संघात नणंद विरूध्द भावजय असा सामना होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत आहे. अजित पवरांच्या पत्निसुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे की, बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. बारामतीत एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

सुनेत्रा पवारांचं वक्तव्य -

सुनेत्रा पवार ह्या बारामतीत आयोजित एका कार्यक्रमात म्हणाल्या की, "बारामतीच्या विकास कामाविषयी तळागाळातील प्रत्येकजण साक्षीदार आहे. अजित दादांना तुम्ही सर्वांनी नेहमी प्रेम दिलं आहे. त्या प्रेमावर खरे उतरण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू,बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल, अशी आशा मी बाळगते." सुनेत्रा पवारांचं हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असणार असल्याचे स्पष्ट चित्र आहे.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ?

राष्टवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे या सुनेत्रा पवारांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावत म्हणाल्या की, "खासदार होण्याच्या दोन वर्ष अगोदरपासून मी या मतदारसंघाचे दौरे करत होते. त्यामूळे मतदारसंघात फिरणे म्हणजे कुटूंबात काम करण्यासारखे आहे. माझे बारामतीकरांशी गेल्या १८ वर्षांचे हितसंबंध आहेत." सुप्रिया सुळे आपल्या मतदारसंघात दौरे करत आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा महाराज आणि संत रोहिदास महाराज यांच्य प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपल्या दौऱ्याला प्रारंभ केला. यामुळे आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यापैकी बारामती मतदारसंघात कोण अग्रेसर ठरेल हे पाहणे महत्वाचे ठरेल. 

Tags:    

Similar News