Jayant patil Vs Sujay Vikhe : षंढांना भुमिका नसते, जयंत पाटील यांचा सुजय विखे यांच्यावर पलटवार

महाविकास आघाडीवरून केलेल्या टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पलटवार केला.;

Update: 2022-03-28 14:03 GMT

राज्यात भाजप महाविकास आघाडी संघर्ष रंगला आहे. त्यातच भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला नवरा, बायको आणि बिनबोलवलेले पाहुणे अशी बिरुदावली लावत टीका केली होती. त्याचा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला. ( Jayant patil Criticize to Vikhe patil)

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटील यांना खासदार सुजय विखे पाटील यांनी केलेल्या नवरा, मुकी बायको आणि लग्नाला न बोलवलेले पाहुणे या वक्तव्यावर प्रश्न विचारला. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, नवरा, बायको, पाहुणे हे आमच्यातल्या सगळ्यांना दिसत आहेत. पण षंढांना काय बिरुदावली द्यायची. षंढ हे कुठल्याच भुमिकेत नसतात. त्यामुळे त्यांच्यावर मी काही जास्त बोलत नाही, असे म्हणत जयंत पाटील यांनी खासदार सुजय विखे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा विखे पाटील विरुध्द राष्ट्रवादी वाद रंगण्याची चिन्हे आहेत.(Sujay Vikhe patil is Stupid, said Jayant patil)

काय म्हणाले होते सुजय विखे पाटील-

भाजप खासदार सुजय विखे पाटील महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले होते की, महाविकास आघाडीत राष्ट्रवादी म्हणजे नवरा, शिवसेना म्हणजे मुकी बायको आणि काँग्रेस म्हणजे बिन बोलवलेले पाहुणे. त्यामुळे काँग्रेसच्या मताला किंमत नसल्याची टीका केली होती. त्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

Tags:    

Similar News