Pune | Congress मध्ये फूट, स्थानिक नेते Aba Bagul BJP च्या वाटेवर

Update: 2024-04-15 16:45 GMT

काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडी कडून पुणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पुणे काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य पाहायला मिळाले.

निष्ठावंतांची हत्या अशा आशयाने पुणे काँग्रेस भवन येथे आबा बागुल यांनी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना एकत्र करत आंदोलन देखील केले होते. या नंतर आज बागुल यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यामुळे पुण्याच्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चांना उधळण आले आहे.

आबा बागुल हे पुणे काँग्रेसमध्ये सक्रिय होते. बागुल यांनी

पुणे उपमहापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, पुणे महानगरपालिका विरोधी पक्षनेते अशा विविध पदांवर काँग्रेसची धुरा सांभाळली. मात्र रवींद्र धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली नाराजी व्यक्त केली होती. पुण्याच्या काँग्रेस भवन येथे बागुल यांनी निष्ठावंतांची हत्या हे आंदोलन देखील केले होते. यावेळी ,दगेकरांना उमेदवारी ही खरंतर निष्ठावांताची हत्या आहे. हा निष्ठावंत लोकांना धक्का आहे. आम्हला न्याय मिळेल ही अपेक्षा आहे. आम्हीं ४० वर्ष काम केलं मात्र तिकीट दिलं नाही. मोहन जोशी, उल्हास पवार, आणि माझ्या सारख्या निष्ठावंतांना डावलून ही उमेदवारी दिली आहे. अशी खतखत आबा बागुल यांनी व्यक्त केली होती.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे मतदान 13 मे रोजी असून प्रचार परक्रिया रंगात आली असताना आबा बागुल यांनी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याने आबा बागुल काँग्रेसची वाट सोडून भाजपच्या वाटेवर जातील अशी जोरदार चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये पाहायला मिळत आहे. आबा बागुल यांच्या भाजप प्रवेशाने पुणे काँग्रेसला कितपत फटका बसेल हा सध्या चर्चेचा विषय आहे. मात्र प्रचार प्रक्रिया रंगात आल्यानंतर बागुल यांनी घेतलेली भाजप नेत्यांची भेट रंगात भंग टाकणारी ठरत आहे. असे म्हटले तर वावगे नाही. येत्या काळात आबा बागुल काँग्रेस सोबत राहतील की भारतीय जनता पक्षाची वाट धरतील हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Tags:    

Similar News