एट्रॉसिटीबद्दलच्य़ा वक्तव्यावर संजय गायकवाड ठाम

Update: 2021-07-08 15:41 GMT

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी एट्रॉसिटी बद्दल केलेल्या वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. काही दिवसांपूर्वी केलेल्या या वक्तव्यावर गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील एका गावात दोन कुटुंबांमधील वादासंदर्भात गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वादातील एका पीडित कुटुंबाच्या समर्थनार्थ "गरज भासल्यास अस्त्र-शस्त्रासह १० हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन" असे वक्तव्य गायकवाड यांनी केले होते. पण आता त्यांनी याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. "पिडीत नागरिकांना आधार वाटावा म्हणून भावनेच्या भरात आपण बोलून गेलो होतो, त्यामूळे मी दिलगीरी व्यक्त करत आहे," असे त्यांनी म्हटले आहे. तसेच कुणी ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करत असेल तर तुम्हीसुद्धा समोरच्यावर चोरीचे खोटे गुन्हे दाखल करा, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. पण आपण या वक्तव्यावर ठाम असल्याचेही संजय गायकवाड यांनी सांगितले आहे.

संजय गायकवाड यांनी काय वक्तव्य केले होते?

"अस्त्र-शस्त्रासह १० हजार कार्यकर्त्यांची फौज घेऊन तुमच्या पाठीशी उभा राहीन. कुणी ऍट्रॉसिटी करत असेल तर तुम्ही सुद्धा समोरच्यावर खोटे रॉबरीचे गुन्हे दाखल करा, ऍट्रॉसिटीच्या गुन्ह्यात 2 दिवसात जमानत होऊन जाईल, पण रॉबरीच्या गुन्ह्यात 3 महिने सुद्धा यांची जमानात होणार नाही. त्याठिकाणी कोणता ठाणेदार गुन्हा दाखल करत नाही ते आम्ही बघून घेऊ," असे चिथावणीखोर वक्तव्य त्यांनी केले होते.

Tags:    

Similar News