आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख ठरली

राज ठाकरे यांच्यापाठोपाठ आदित्य ठाकरे यांचाही अयोध्या दौरा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र आता शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली आहे.;

Update: 2022-06-06 04:59 GMT

राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर आदित्य ठाकरे ठाकरे अयोध्येला कधी जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. त्यापार्श्वभुमीवर शिवसेनेने आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख जाहीर केली आहे.

राज ठाकरे यांनी 5 जून रोजी अयोध्येला जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभुषण सिंह यांनी विरोध केल्यानंतर आणि राज ठाकरे यांनी शस्रक्रियेचे कारण देत अयोध्या दौरा स्थगित केला होता. दरम्यान संजय राऊत यांनीही 10 जून रोजी आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे म्हटले होते. मात्र राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर आदित्य ठाकरे यांचाही दौरा पुढे ढकलण्यात आला होता. मात्र त्यानंतर आता संजय राऊत यांनी ट्वीट करून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची माहिती दिली आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करून आदित्य ठाकरे 15 जून रोजी शेकडो शिवसैनिकांसह अयोध्येला जाणार आहेत. तसेच रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत. तसेच संजय राऊत यांनी पुढे जय श्रीराम असे म्हटले आहे.

Tags:    

Similar News