'गाणं म्हणणं, चेहरा बदलणं यात रश्मी ठाकरे कधी पडल्या नाहीत'

शिवसेनेला 'शवसेना' म्हणणाऱ्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना निलम गोऱ्हे यांनी खरमरीत उत्तर दिलं आहे...;

Update: 2020-11-13 04:31 GMT

'का हय ये - शवसेना ने अपने ही साथियों की लाशें बिछा दी बिहार में! काय चाल्लय तरी काय - शवसेनेने आपल्याच साथीदारांना ठार मारले बिहारमध्ये! महाराष्ट्र कुठेही नेलेला असो पण बिहार योग्य ठिकाणी नेऊन ठेवल्याबद्दल धन्यवाद', अशा प्रकारचे ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. या टिकेला आता शिवसेना नेत्या आणि विधानपरिषदेचे उपसभापती निलम गोऱ्हे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

'गाणं म्हणणं, चेहरा बदलणं, अगोदरचा चेहरा नंतरचा चेहरा आणि वेगवेगळी विधानं करणे, असं त्यांना जमलं आहे. रश्मी ठाकरे यात कधी पडलेल्या नाहीत,' असं म्हणत अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

निलम गोऱ्हे इथंच थांबल्या नाही तर... त्यांनी अमृता यांच्या नावाची फोड करत त्यांना मानसिक स्वास्थ सांभाळण्याचा देखील सल्ला दिला आहे.

'अमृता या शब्दातील 'अ' चे भान महत्त्वाचे आहे. अमृताताई आपण या दीपावलीच्या दिवसांत अमंगल विचार मनात आणू नयेत. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही'. आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जावू देवू नका, मोदीजी सांगतात तसा अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मन:स्वास्थ्य चांगले राहते आणि हो शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शव वाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते. हे देखील आज विसरू नका, आपल्या नावात 'अ' चं महत्त्व आहे आणि ते निघाले तर 'मृता' उरेल, तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वत:चे मानसिक स्वास्थ्य जपा, 'अ' मंगल विचार मनात आणणे 'अ' योग्य बरे का, ही दीपावली आपल्या बुद्धीत ज्ञानाचा प्रकाश टाकणारी जावो, अशा शब्दा अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Tags:    

Similar News