शरद पवार यांचा पावर प्लॅन, एकनाथ खडसे करणार भाजपची कोंडी?
राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकनाथ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीच्या माध्यमातून हा शरद पवार यांचा पावर प्लॅन आहे का? तसेच खडसे यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यास भाजपची कोंडी होणार का? हे जाणून घेण्यासाठी वाचा...;
राज्यसभेपाठोपाठ विधानपरिषद निवडणूकीसाठी सर्व पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, एकनाथ खडसे आणि शिवाजीराव गर्जे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे खडसे यांच्या माध्यमातून शरद पवार 'पावर गेम' खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पुर्वाश्रमीचे भाजपचे आणि आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून विधानपरिषदेत भाजपला घेरण्याचा गेम शरद पवार खेळत असल्याचे समोर आले आहे.
खडसेंमुळे होणार भाजपची कोंडी?
2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडल्यापासून एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे नाराज होत्या. तर त्यावेळी एकनाथ खडसे यांना कृषी आणि महसूल मंत्रीपद देण्यात आले होते. मात्र खडसे त्यानंतर अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपद सोडावे लागले होते. तेव्हापासून देवेंद्र फडणवीस विरुध्द एकनाथ खडसे संघर्ष रंगला होता. तर एकनाथ खडसे यांनी अनेकवेळा फडणवीस यांच्याविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर राष्ट्रवादीने प्राथमिकतेने राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वासाठी नामनिर्देशित केले होते. मात्र २ वर्षानंतरही त्यावर निर्णय न झाला नाही. तर एकनाथ खडसे यांना रोखण्यासाठी ही भाजपची खेळी होती, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. मात्र भाजपने खेळी करूनही एकनाथ खडसे यांना उमेदवारी मिळाल्याने विधानपरिषदेत पोहचण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एकनाथ खडसे यांची बलस्थानं काय आहेत?
- गोपिनाथ मुंडे यांचे समर्थक म्हणून ओळख असलेल्या एकनाथ खडसे यांनी मुंडेंसोबत भाजप खेड्यापाड्यात पोहचवण्याचा मोठा प्रयत्न केला. त्यामुळे तळागाळाशी नाळ असलेला नेता म्हणून एकनाथ खडसे यांची ओळख आहे.
- एकनाथ खडसे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. तसेच त्यांची ओळख ओबीसी नेते म्हणून आहे. तर ओबीसींच्या मुद्द्यावर भाजप बहूजनांना डावलत असल्याची भावना निर्माण करण्यात खडसे यशस्वी होण्याची शक्यता आहे.
- एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर विरोधक आहेत.
- एकनाथ खडसे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे विधानपरिषदेत भाजपकडून होत असलेल्या हल्ल्यांना एकनाथ खडसे हे जोरदार प्रत्युत्तर देऊ शकतात. त्यामुळे एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिली असल्याचे म्हटले आहे.
- एकनाथ खडसे यांनी 1990 पासून 2019 पर्यंत विविध पदांवर काम केले आहे. त्याबरोबरच 2009 ते 2014 या काळात एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही भुषवले होते. त्यामुळे विधीमंडळातील कामकाजाच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो.
- एकनाथ खडसे विधानपरिषदेवर निवडून गेल्यास आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत भाजपला जोरदार प्रत्युत्तर देण्यासाठी राष्ट्रवादीला मोठा फायदा होणार आहे. तसेच एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांचे पुनर्वसन करण्याचा शब्द राष्ट्रवादीने दिला होता. तो यानिमीत्ताने पुर्ण करता येणार आहे.