शरद पवारांचा पलटवार; म्हणाले आधी ते पत्र नीट वाचा...

शेतकरी आंदोलन आणि भारत बंद सुरु असताना भाजपाच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना टार्गेट करुन त्यांच्या आत्मचरीत्रं आणि २०१० ची पत्रं व्हायलर करणाऱ्या भाजप नेत्यांना पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं असा टोला लगावला आहे.;

Update: 2020-12-08 09:55 GMT

तीन कृषी सुधारणा कायद्यांवरुन दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु असताना आज देशभर विरोधी पक्षांकडून भारत बंद आंदोलन सुरु आहे. शरद पवारांनी याच मुद्द्यावरुन राष्ट्रपतींची भेट घेण्याचे निश्चित केल्यानंतर भाजपची सोशल मिडीया सेल आणि भाजपनेत्यांनी पवारांना टार्गेट करुन टीका सुरु केली होती.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. दोघांमध्ये साधारणतः अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना शरद पवार यांनी 2010 मधील त्या पत्रावरही भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं, असं वक्तव्यही त्यांनी केलं आहे. पुरंदर विमानतळाच्या जमीन अधीग्रहणासंदर्भात यावेळी चर्चा झाल्याचंही शरह पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे

शरद पवार यांनी यावेळी विषय भरकटवण्यासाठी हे उद्योग केलं जात असल्याचाही आरोप केला. याला जास्त महत्व देऊ नका असंही ते म्हणाले आहेत. शरद पवारांनी आपण शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचं सांगितलं. कृषी कायद्यासंदर्भात चर्चा झाल्याशिवाय त्याबाबत काहीही भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

काल झालेल्या पत्रकार परीषदेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राच्या शेतकरी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केल्यानंतर भाजप नेत्यांनी त आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या शेतकरी आंदोलन आणि भारत बंद सुरु असताना भाजपाच्या वतीने माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांना टार्गेट करुन त्यांच्या आत्मचरीत्रं आणि २०१० ची पत्रं व्हायलर करणाऱ्या भाजप नेत्यांना पवार म्हणाले की, ते पत्र कृषी कायद्यांमधील सुधारणांसंदर्भात लिहिलेलं होतं. तसेच त्या पत्रावर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांनी ते पत्र बारकाईनं वाचायला हवं होतं असा टोला लगावला आहे.नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच 2010 साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला होता.




Tags:    

Similar News