पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्या नंतर .उद्या हडपसर मध्ये शरद पवार गटाचा मेळावा होणार आहे. ह्या मेळाव्याला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थीत राहणार आहे. अशी माहिती आता समोर येत आहे.
ह्या संदर्भात पुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची बैठक पुणे राष्ट्रवादीचा शरद पवार गटाच्या पक्ष कार्यालयात झाली. ह्या पैठकी दरम्यान राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे नेते मा. आमदर आंकुश नाना काकडे, शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, माझी शहर अध्यक्ष रविद्र माळवदकर या बरोबर आजिमाजी नगरसेवक आणि मोठया संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
ह्या वेळी शरद पवार गटाची पुढची दिशा काय आसेल ह्या संदर्भात चर्चा झाली. उद्या होणाऱ्या मेळाव्या संदर्भात चर्चा देखील झाली.