आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालावरून शरद पवारांची मोदींवर टीका!

Update: 2024-04-20 12:06 GMT

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर शरद पवार यांनी आपल्या महाविकास आघाडीकडून जालन्याचे उमेदवार कल्याण काळे आणि संभाजीनगरचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे मविआच्या कार्यकर्यांचा मेळावा घेतला. याप्रसंगी बोलताना पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.

शरद पवार यावेळी म्हणाले की, २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला बेरोजगारी कमी करण्याचं आणि महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. परंतु त्यांना त्या गोष्टी करता आल्या नाहीत. त्याचबरोबर स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती कमी करू, पेट्रोल-डिझेलच्या किंमती ५० टक्क्यांनी कमी करू. मात्र या वस्तूंच्या किंमती कमी होण्याऐवजी वाढत असल्याचं आपण पाहतोय. दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या वस्तूंच्या किंमती मोदींना कमी करता आल्या नाहीत, असं पवार म्हणाले.

देशात रोजगाराचं प्रमाण कमी होऊन बेकारांनी संख्या वाढली आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवारांनी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने जगभरात केलेल्या सर्व्हक्षणाचा अहवाल सादर करत म्हणाले की, या अहवालानुसार भारतात जेव्हा १०० मुलं शिक्षण पूर्ण करू बाहेर पडतात. त्यावेळी त्यांच्यापैकी ८७ मुलं ही बेकार राहतात. म्हणजेच देशात ८७ टक्के बेकरीचं प्रमाण आहे अन् त्याच देशाचे पंतप्रधान या तरूणांच्या भविष्याचा विचार करत नसतील तर अशा पंतप्रधानांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही, असं शरद पवार यावेळी बोलताना म्हणाले. 

Tags:    

Similar News

Kamla ahead of Trump?