परमबीर सिंग यांच्यावर व्हिडिओ बॉम्ब, सहाय्यक पोलीस आयुक्ताचे गंभीर आरोप
१०० कोटींच्या वसुलीचा आरोप करणारे परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकला होता.आता त्यांच्या विरोधात सहायक पोलीस आयुक्तांनी व्हिडिओ बॉम्ब टाकला आहे.
अवैध वाहतूकीला अभय देणाऱ्या परमबीर सिंग यांनी वसुलीच्या आड येतो म्हणून खोट्या गुन्ह्यात फसवले. एवढेच नाहीतर त्यासाठी एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या खुनाला आत्महत्या दाखवण्याचा गंभीर गुन्हा परमबीर सिंग यांनी केला, असा आरोप सहायक पोलीस आयुक्त निपुंगे यांनी केला आहे. आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक आपल्याला गोवण्यात आल्याचा आरोपही त्यानी केला आहे. परमवीर सिंग हे मुंबई पोलीस आयुक्तपदाची असताना सोन्याची मागणी करत होते, असा गंभीर आरोप त्यांच्यावर आधीच झाला आहे. त्यात आता परमबीर सिंग यांच्यावर कृष्णकृत्याचा आणखी एका धक्का धक्कादायक
आरोप सहाय्यक पोलीस आयुक्त निपुंगे यांनी केला आहे. भिवंडी येथे वाहतूक शाखेत असताना परमबीर सिंग हाताखालच्या अधिका-यांना वसूली करायला सांगायचे. आणि त्यांना विरोध केला म्हणून कसे आपल्याला एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आले याची माहिती देत निपुंगे यांनी परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
एका महिला पोलीस शिपायाच्या आत्महत्येप्रकरणी आपल्याला गोवण्यात आले,एवढेच नाहीतर मुद्दाम तुरूंगात टाकून जामीन मिळू नये यासाठी कसे प्रयत्न केले याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच निपुंगे यांना कसे खोट्या पद्धतीने गोवले याची माहिती त्यांचे सहकारी असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त कदम यांनीच त्यांना दिली आहे. इतकेच नाही तर मनसुख हिरेन यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टेम ज्यांनी केले त्या डॉ घाडगे यांनीच निपुंगे यांना गोवण्यात आलेल्या सुभद्रा आत्महत्या प्रकरणातील महिलेच्या मृतदेहाचेसुध्दा घाडगे यांनीच पोस्टमॉर्टेम केलें होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी केला आहे.
पुरावा म्हणून याबाबतचा एक व्हिडीओ सुद्धा निपुंगे यानी दिला आहे. या व्हिडीओमध्ये निपुंगे यांना कसे अडकवण्यात आले याची सविस्तर माहिती कदम देत असल्याचे स्पष्टपणे दिसते आहे. त्या महिला पोलीस शिपायाने आत्महत्या केली नव्हती तर तिचा खून झाला होता. आणि तो तिच्याच प्रियकराने केल्याचे माहिती असूनही तुम्हाला खात्यामधून दूर करण्यासाठी परमबीर सिंग यांनी हा कट रचला होता, हे आपल्या लक्षात आले होते असे कदम यांनी या व्हिडीओत सांगितले आहे.
त्यामुळे कदम यांच्या या दाव्याचा विचारांचा केला तर निपुंगेच्या आरोपांना आधार मिळतो. त्यामुळे आपल्या स्वार्थासाठी आणि वसुली अबाधित रहावी यासाठी एका महिला पोलिसाच्या खुनाला आत्महत्या दाखवून तिच्या वर तर अन्याय केलाच. त्याशिवाय वसूलीच्या आड येणा-या एका अधिका-यालाही सिंग यांनी गुतवून काटा काढल्याचा आरोप निपुंगे यांनी केला आहे. निपुंगेंनी या प्रकरणी परमबीर सिंग यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
सचिन वाझे प्रकरणात लेटर बॉम्ब टाकून अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडणार्या परमवीर सिंग यांना आता मोठा धक्का बसलेला आहे.