महिला आरक्षण विधेयक स्थायी समितीकडे पाठवा, मनोज झा यांनी केली मागणी

Update: 2023-09-21 10:50 GMT

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झाले. त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत चर्चेसाठी आले आहे. यावर बोलताना मनोज झा यांनी हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली.

महिला आरक्षण विधेयक हे 33 टक्केच का? 50 किंवा 55 टक्के दिलं तरी त्याचं आम्ही स्वागत करू. मात्र ज्या पद्धतीने SC, ST समाजातील महिलांना त्यांच्याकडे असलेल्या 136 जागांमधूनच आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा ओबीसी महिलांवर मोठा अन्याय आहे. त्यामुळे सरकारने हे विधेयक स्थायी समितीकडे पाठवावे आणि मोठ्या कॅनव्हासवर विचार करावा. अन्यथा आपण इतिहासाचे गुन्हेगार ठरू, असं मत मनोज झा यांनी व्यक्त केले.

तसेच महिला आरक्षणावरच्या भाषणाचा शेवट मनोज झा यांनी कवितेतून केला. यावेळी ते म्हणाले,

चुल्हा मिट्टी का, मिट्टी तालाब की

तालाब ठाकूर का

भूक रोटी की, रोटी बाजरे की

बाजार खेत की, खेत ठाकूर का

बैल ठाकूर का, हल ठाकूर का

हल की हथेली पर मूठ अपनी, फसल ठाकूर की

कुआँ ठाकूर का, पाणी ठाकूर का

खेत खलियान ठाकूर के

गली मोहल्ले ठाकूर के

फिर अपना क्या

गाँव, शहर देश

वो ठाकूर मैं भी हूँ

वो ठाकूर संसद में है

वो ठाकूर विश्वविद्यालयों में है

उस ठाकूर को मारो, असंही मनोज झा म्हणाले.

Tags:    

Similar News