निवडणूक आयोगावर संजय राऊतांची टीका
सांगलीतील एका कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची पुन्हा एकदा जीभ घसरल्याचे ऐकायला मिळाले. राऊत यांनी निवडणूक आयोगाला उद्देशून आक्षेपार्ह शब्दाचा वापर करत, शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का?
ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे दररोज काही ना काही वक्तव्य करुन चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. दररोज सकाळी प्रसारमाध्यमांसमोर सनसनाटी वक्तव्य करुन चर्चेत राहण्याचे काम राऊत करत आहेत. आज पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरल्याचे ऐकायला मिळाले. गुरुवारी संजय राऊत यांनी विधीमंडळाला चोर म्हटले होते. त्यावरुन सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पीय त्यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली होती. यातच आता राऊत यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले. यावेळी त्यांनी थेट निवडणूक आयोगावर टिका केली आहे.
संजय राऊत हे सध्या सांगली (Sangli) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी ५० खोके हे अख्ख्या जगात पोहचले, अशी टिका सत्ताधाऱ्यांवर केली. मुख्यमंत्र्यांविषयी इथे बोलणे योग्य नाही मात्र जनतेच्या भावना असतील तर मला मुख्यमंत्र्यांबाबत बोलावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी स्वत: उपाशी राहून तुम्हाला आमदार-खासदार केले. खरे शिवसैनिक इथेच आहेत आणि निवडून दिलेले ५० खोके घेवून पळून गेले. आता निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना (Shiv Sena) त्यांची आहे. अरे तुमच्या बापाची आहे का शिवसेना? ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना आणि भाजपला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.
४० चोरांनी आणि दिल्लीच्या रंगा बिल्लांना काय वाटतं? निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. पण, शिवसेनेची ताकत कोणाच्या दावणीला लागणार नाही. असे ही राऊत म्हणाले. भाजपने (BJP) पाठीत खंजीर खूपसले, हे भांडण ४० चोरांशी नाही, भाजपशी असल्याचे राऊत यांनी सांगितले.