झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर देऊ, संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना इशारा

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. त्यावरून हे सगळं सरकार आणि पोलिस स्पॉन्सर असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यावर झुंडशाहीला झुंडशाहीने उत्तर देऊ, असा इशारा संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.

Update: 2022-04-23 08:10 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष रंगला असतानाच खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणा या राणा दांपत्याने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर जाऊन हनुमान चालीसा पठन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून राज्यात हायहोल्टेज ड्रामा सुरू आहे. तर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर गर्दी केली आहे. त्यापार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस यांनी राणा दांपत्याला हनुमान चालीसा पठन करण्यापासून अडवण्यासाठी राज्य सरकार आणि पोलिस स्पॉन्सर हा सगळा खेळ सुरू असल्याची टीका केली होती. त्यावर संजय राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले.

देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, हे सगळं सरकार स्पॉन्सर आणि पोलिस स्पॉन्सर असल्याचे म्हटले. पण मग तुम्ही काय करताय. केंद्रीय पोलिस स्पॉन्सर आणि केंद्रीय तपास यंत्रणा स्पॉन्सर तुमची ही झुंडशाही आहे या झुंडशाहीला शिवसैनिकांनी झुंडशाहीने उत्तर दिले तर काय बिघडलं असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून, राष्ट्रपती राजवट लावण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मात्र हिंमत असेल तर राष्ट्रपती राजवट लावा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले आहे.

मोहित कुंबोज यांच्या गाडीवर शिवसेनेने केलेल्या हल्ल्यावर आणि खासदार नवणीत राणा यांच्या खार येथील घरात शिवसैनकांनी घुसण्याचा प्रयत्न केला. यावर बोलताना सामान्य शिवसैनिक जसा या घटनेकडे बघत आहे. तसाच मीही या घटनेकडे बघत असल्याचे मत संजय राऊय यांनी व्यक्त केले.

राणा दांपत्याने मातोश्रीवर जाण्याबाबत दिलेल्या इशाऱ्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, तुम्ही लक्ष्मणरेषा ओलांडाल तर शिवसैनिकही संतापून तुमच्या घरात घुसेल, अशा इशारा राऊत यांनी दिला.

संजय राऊत पुढे म्हणाले की, केंद्रीय पोलिस बलाचा वापर करून तुम्ही आमच्या घरात घुसणार असाल तर आम्हाला आमच्या रक्षणासाठी पोलिसांची गरज नाही. शिवसैनिक हा मरायला आणि मारायला कायम तयार असतो, असे संजय राऊत म्हणाले.

Tags:    

Similar News