संजय राऊत यांच्यासह राज्यातील ६ दिग्गज नेत्यांची खासदारकीची मुदत संपणार
महाराष्ट्रातून रिक्त झालेल्या राज्यसभेच्या 6 रिक्त जागांसह 15 राज्यातील एकूण ५७ जागांसाठी निवडणूक आयोगाने राज्यसभेची निवडणूक जाहीर केली आहे.;
राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. तर त्यापैकी ६ जागा महाराष्ट्रातील आहेत. त्यातच या दिग्गज सहा खासदारांची राज्यसभेची मुदत ३१ मे रोजी संपणार आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्यात राजकीय खलबतांना वेग आला आहे.
महाराष्ट्रात रिक्त झालेल्या जागांमध्ये भाजपच्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, डाॅ. विनय सहस्रबुद्धे, डाॅ विकास महात्मे, राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेस चे नेते पी चिंदबरम यांची खासदारकीची मुदत संपली आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे.
राज्अयर्ज दाखल करण्याची मुदत 31 मे पर्यंत असून 10 जूनला मतदान होणार आहे. घोडेबाजार टाळण्यासाठी शक्यतो राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्यावर राजकीय पक्षाचा प्रयत्न असतो. त्यामुळं शक्यतो ३१ मे च्या अगोदर यंदा कोणत्या नेत्यांना पक्षाकडून संधी दिली जाते. हे समोर येईल
पक्षबळाचा विचार करता केला तर भाजप २ खासदार, काँग्रेस चे १ खासदार, शिवसेनेचे १ खासदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे १ खासदार सहज निवडून येऊ शकतात. मात्र, ६ व्या जागेसाठी चुरस महाविकास आघाडीकडे २६ मतं शिल्लक राहतात तर २२ मत भाजपकडे… या उरलेल्या मतांवर छत्रपती संभाजीराजे यांनी त्यांना निवडून देण्याची विनंती राज्यातील सर्व प्रमुख पक्षांना केली आहे.