...बंदर के हात में माचिस किसने दी, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना खोचक टोला
गेल्या काही दिवसापासून राज्यात राजकारण तापले आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच राज ठाकरे यांनी भोंग्यावरून घेतलेल्या भुमिकेमुळे शिवसेना हिंदूत्वाच्या मुद्द्यावरून कात्रीत सापडली आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला.;
संजय राऊत म्हणाले की, त्यांना जमलेल्या माझ्या मराठी बंधू भगिनींनो म्हणायचे की हिंदू बंधू भगिनींनो म्हणायचे असा प्रश्न पडत असेल, असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. आमच्या खांद्यावर बाळासाहेबांनी दिलेला भगवा आहे. जो छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे स्मरण केल्याशिवाय दिवस उजाडत नाही. कारण त्यांनी महाराष्ट्र घडवला, शिवसेना उभी केली आणि स्वाभिमान दिला, असे संजय राऊत म्हणाले.
तसेच पुढे बोलताना म्हणाले की, आज जागतिक व्यंगचित्रदिन आहे. त्यामुळे बाळासाहेबांची आठवण येत आहे. पण सध्या काही लोक पेटवा पेटवीची भाषा करत आहेत, असे म्हणत राज ठाकरे यांना टोला लगावला. पुढे बोलताना म्हणाले की, सवाल ए नाहि है की बस्तीया क्यो जली, सवाल ए है की बंदर के हात मे माचीस किसने दी, असा खोचक टोला राज ठाकरे यांना लगावला.
संजय राऊत यांची जीभ घसरली
राज्यात किरीट सोमय्या आणि संजय राऊत यांच्यात वाद रंगला आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यापार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी पुणे येथे बोलत असताना किरीट सोमय्यांवर निशाणा साधला.
संजय राऊत म्हणाले, पुण्यातील शिवसैनिकांचे कौतुक केले पाहिजे. कारण त्यांनी पुणे महापालिकेत किरीट सोमय्या यांना पायरी दाखवली. तसेच किरीट सोमय्या हे आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. त्यावर बोलताना संजय राऊत किरीट सोमय्या यांना उद्देशून म्हणाले की, स्वतः शेण खाता आणि वास आमच्या तोंडाचा घेता का? अशा असंसदीय शब्दांचा वापर केला.
हमसे जो टकराएगा, मिट्टी में मिल जायेगा, अशा शब्दात किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपांना संजय राऊत यांनी उत्तर दिले. तसेच किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारमधील डर्टी डझन नेत्यांना जेलमध्ये टाकणारच असा इशारा दिला होता. त्यामध्ये संजय राऊत यांचेही नाव घेतले होते. त्यावरून राऊत म्हणाले, जेलमध्ये टाकणआर म्हणतोय. मग जेल काय तुझ्या बापाची आहे का? तसेच संजय राऊत तुमच्या विरुध्द बोलतो म्हणून तुम्ही संजय राऊतला त्रास देत आहातय पण महाराष्ट्र तुमच्यासमोर झुकणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि भाजपवर टीका केली.