संजय राऊत यांच्या ट्वीटची चर्चा, पण नेमका अर्थ काय?

संजय राऊत यांनी INS विक्रांत युध्दनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये उभ्या केलेल्य चळवळीच्या माध्यमातून मोठा देशद्रोह केल्याचा आरोप केला आहे.;

Update: 2022-04-08 03:01 GMT

राज्यात शिवसेना भाजप संघर्ष सुरू आहे. त्यातच संजय राऊत यांनी INS विक्रांत युध्दनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी 2013 मध्ये उभ्या केलेल्य चळवळीच्या माध्यमातून मोठा देशद्रोह केल्याचा आरोप केला आहे. तर यानंतर आज सकाळी संजय राऊत यांनी नवे ट्वीट करून चर्चेचा धुरळा उडवून दिला आहे.

ED ने मालमत्ता जप्तीची कारवाई केल्यानंतर संजय राऊत आक्रमक झाले आहेत. तर त्यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना टार्गेट करत 2013 साली किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत ही युध्दनौका वाचवण्यासाठी लोकांकडून 56 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप केला आहे. तसेच लोकांचा पैसा राजभवनकडे जमा केला नसल्याचा दावा माहिती अधिकाराच्या माध्यमातून केला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. त्यामुळे किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. (Sanjay Raut Vs Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाईसाठी ED कडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत ED ने राऊत यांची मालमत्ता जप्त केली. त्या कारवाईनंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांनी 2013 ते 2015 या काळात INS विक्रांत वाचवण्यासाठी जमा केलेला पैसा राजभवन क़डे जमा केला नसल्याचा आऱोप केला आहे. त्यावरुन देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) सोमय्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत संजय राऊत यांनी फडणवीस यांची लाज काढली होती. तर किरीट सोमय्यांनी 2 मिनिटात पत्रकार परिषद गुंडाळल्यामुळे संजय राऊत यांनी टीका केली होती.

यानंतर आता अखेर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एक शेर ट्वीट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, दुसऱ्यांना विनाकारण बदनाम करणाऱ्यांनी स्वतःमध्ये डोकून पहावे. मग त्यांना समजेल की त्यांच्या इतका मळलेला या जगात दुसरा कोणीही नाही, अशा आशयाचे ट्वीट करून संजय राऊत यांनी इशारा दिला आहे.

किरीट सोमय्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका करत आहेत. मात्र संजय राऊत यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेल्या पैशाचा मुद्दा उपस्थित करून किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ट्वीटमधून लगावलेला टोला सोमय्यांना आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्यांवर आरोप केले आहे. त्यामध्ये संजय राऊत यांनी म्हटले आहे की, 2013 ते 2015 या काळात किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत ही देशाची अस्मिता असलेली युध्दनौका वाचवण्यासाठी लोकांकडून 56 कोटी रुपये गोळा केले होते. ते पैसे राजभवनला जमा झाले नसल्याचा आऱोप संजय राऊत यांनी केला. त्यामुळे किरीट सोमय्यांनी देशद्रोह केला आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

त्यामुळे किरीट सोमय्यांवर देशद्रोहाच्या गुन्ह्यांतर्गत कारवाई करण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली आहे.

Tags:    

Similar News