मोठी घोषणा : संभाजी राजे यांची राज्यसभेच्या निवडणुकीतून माघार
संभाजी राजे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्यसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. तर त्यासाठी सर्वपक्षांनी पाठींबा द्यावा, अशी विनंती केली होती. मात्र त्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांना उमेदवारी दिल्यानंतर संभाजी राजे यांनी मोठी घोषणा केली आहे.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. तसेच त्यानंतर सर्वपक्षांनी मला राज्यसभेत पाठवण्यासाठी पाठींबा द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र संभाजी राजे यांनी शिवबंधन बांधल्याशिवाय शिवसेनेकडून पाठींबा नाही, अशी अट टाकण्यात आली. मात्र संभाजी राजे यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी नकार दिल्याने शिवसेनेने संजय पवार यांना सहाव्या जागेसाठी उमेदवारी दिली. त्यामुळे संभाजी राजे यांनी अखेर निवडणूकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना संभाजी राजे म्हणाले की, मी या निवडणूकीतून माघार घेत आहे. पण ही माझी माघार नाही. तर हा माझा स्वाभिमान आहे. त्यामुळे मी निवडणूकीतून माघार घेत आहे. याबरोबरच यापुढे मी राज्यात स्वराज्य संघटन वाढवण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भुमिका संभाजी राजे यांनी मांडली.