...तर काँग्रेसला राज्यातून हद्दपार करू, सकल मराठा समाजाचा इशारा

Update: 2021-09-02 12:04 GMT

खासदार संभाजी राजेंवर अप्रत्यक्ष टीका करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना सकल मराठा समाजाकडून इशारा देण्.त आलेला आहे. सोलापुर मध्ये काही दिवसांपुर्वी ओबीसी निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजी राजेंवर अप्रत्यक्ष टीका केली होती. या टीकेला उत्तर देत सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी वडेट्टीवीरांना इशारा दिला आहे.

सोलापुरात कांही दिवसांपूर्वी राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात 'ओबीसी निर्धार मेळावा' पार पडला होता. या मेळाव्यात मराठा आरक्षणावरून "काही महाराज हे तुमच्यातून द्या असं म्हणाले आहेत, माझं त्यांना एकच सांगणं आहे तुमचं तुम्ही घ्या पण आमच्यातील काही मागू नका. अन्यथा रस्त्यावर उतरू धनगराची काठी घेऊन काय करायचं ते ठरवू... काय व्हायचंय ते होऊ देत." , अशी अप्रत्यक्ष टीका मंत्री वडेट्टीवरांनी खासदार संभाजीराजेंवर केली होती.

त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद सोलापुरात उमटू लागल्या आहेत. सकल मराठा समाजाकडून पत्रकार परिषद घेत गुरूवारी मंत्री विजय वडट्टीवार यांचा जाहीर निषेध करण्यात आला. त्याचबरोबर काँग्रेसने मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा मराठा समाज काँग्रेसला महाराष्ट्रातून हद्दपार करेल असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाकडून देण्यात आला.

Tags:    

Similar News