"सदाभाऊ खोतांचा न्यू बिजनेस" सोशल मीडियावर मीम्सचा धुरळा
राज्यसभेपाठोपाठ राज्यात विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. तर यासाठी रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र अखेरच्या दिवशी ऐनवेळी सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा धुराळा उडाला आहे.
शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषद निवडणूकीसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे विधानपरिषद निवडणूकीत दहा जागांसाठी 13 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. मात्र राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जे आणि सदाभाऊ खोत यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्याविषयी सोशल मीडियावर मीम्स व्हायरल होत आहेत.
सदाभाऊ खोत यांनी विधानपरिषद निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर योगेश सावंत या ट्वीटर अकाऊंटवरून एका डंपरचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे. तर त्याला सदाभाऊंची उमेदवारी असं कॅप्शन देण्यात आलं आहे. कारण त्या डंपरवर मिळाली होती पण नशिबात नव्हती असे वाक्य लिहीले आहे.
सदाभाऊंची उमेदवारी 🤣 pic.twitter.com/bCuhaG5wJ4
— yogesh sawant (@yogi_9696) June 13, 2022
योगेश सावंत यांनी केलेल्या ट्वीटला वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही गुड सेन्स ऑफ ह्युमर असं म्हटलं आहे.
Good sense of humour
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 14, 2022
महादेव पोळ यांनी योगेश सावंत यांच्या ट्वीटला रिप्लाय देतांना म्हटले आहे की, आता कायमचा उपाशी
आता कायमचं उपाशी 😂😂
— Mahadeo Pol (@MahadeoPol) June 13, 2022
@vntb89 या ट्वीटर अकाऊटवरून ट्वीट करून म्हटले आहे की, एक जोक. ज्यामध्ये 13 जून हा सोन्याचा दिवस असल्याचे म्हटले आहे. तसेच सदाभाऊ खोत यांची विधानपरिषद आमदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले आहे.
एक जोक. pic.twitter.com/I6uF2H4UXC
— Vi (@vntb89) June 13, 2022
पुढे @vntb89 यांनी आणखी एक फोटो ट्वीट करून सदाभाऊ खोत वडे तळत असल्याचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामध्ये खोतांचा न्यू बिजनेस असे लिहीले आहे.
खोतांचा न्यू business. pic.twitter.com/uE9c1oZnkg
— Vi (@vntb89) June 14, 2022
@kundanAvhad19 या ट्वीटर अकाऊंटरवर सदाभाऊ खोत राईट नाऊ असं शीर्षक देत फोटो ट्वीट केला आहे.
सदाभाऊ राईट नाऊ 👇😂😂@Sadabhau_khot pic.twitter.com/Jfyq6vw4kw
— BURDEN OF PROOF !! (@kundanAvhad19) June 13, 2022
हबीब वासू बीओटी या ट्वीटर अकाऊंटवरून एक फोटो ट्वीट करण्यात आला आहे.
#SadabhauKhot #सदाभाऊ @Sadabhau_khot
— Habibi Vasu BOT🤖 (@botstori) June 14, 2022
😂 pic.twitter.com/Rv7oxt9JCz
प्रविण पाटील या ट्वीटर अकाऊंटवरून कार्टुन कॅरॅक्टर वापरत तुम्ही तुर्तास मागे घ्या. आम्ही तुमच्यासाठी काहीतरी भव्यदिव्य करू असं देवेंद्र फडणवीस म्हणत असल्याचे मीम्स तयार केले आहे.
असं कुठं असतय व्हय ...#विधानपरिषदनिवडणूक @Sadabhau_khot pic.twitter.com/jheH8q0eA9
— Pravin Patil (@pravinp7716) June 13, 2022
अनुज एकनाथ गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीस आणि सदाभाऊ खोत गळाभेट घेत असल्याचा फोटो ट्वीट करत सदाभाऊ खोत यांना राजकीय निवृत्तीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सदाभाऊंची #राजकीय_निवृत्ती झाल्याबद्दल हार्दिक #अभिनंदन...🤣🙏😂
— Anuj Eknath Gaikwad (अनुज अर्चना एकनाथ गायकवाड) (@AnujGaikwad10) June 13, 2022
विधानसभा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून विधानपरिषद उमेदवारी अर्ज मागे घेऊन एक प्रकारे सदाभाऊंनी आपली राजकिय निवृत्तीचं जाहीर केली आहे...
पुढील वैयक्तिक आयुष्यासाठी शुभेच्छा..@Sadabhau_khot pic.twitter.com/HeSJuBTLUu
राज नावाच्या अकाऊंटवरूनही सदाभाऊ खोत यांचे मीम्स व्हायरल केले आहेत.
आझाद मैदानावर @Sadabhau_khot, सतरंजी वर रातभर झोपलो .. नुसतं डास चावून घेतलं .. अन आमचं तिकीटच कापलं !
— RAJ (@RAJspeaks_IN) June 8, 2022
बांबू 👇 🤣🤣🤣 pic.twitter.com/9REjmMMW3I