अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत आक्रमक झाले आहेत. त्यातच सदाभाऊ खोत यांनी थेट शरद पवार यांचा सैतान असा उल्लेख केला आहे.
या महाराष्ट्रातल्या जडणघडणीत यशवंतराव चव्हाण, सुधाकर नाईक, वसंत पाटील या माणसांच मोठ योगदान आहे. ८० च्या दशकामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवारांचा उदय झाला आणि तेथून पुढे राजकारणाच्या ऱ्हासाला सुरूवात झाली. पवारांच्या कालखंडामध्ये असा नवा संघर्ष चालू झाला. पुण्यात "काका मला वाचवा", अशी हाक ऐकू आली होती. पण आता नवी हाक ऐकू येत आहे की, "पुतण्यापासून मला वाचवा. त्यामुळे शरद पवार हे गावगाड्यात जात आहेत, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
पुर्वीच्या काळी ज्याने पाप केलंय. त्याच्या मुलाला फेडावं लागायचं. मात्र आता कलयुग सुरु आहे. यामध्ये जो पाप करतो. त्यालाच फेडावं लागतं. त्यामुळे शरद पवार यांची ही अवस्था झाली आहे. त्याबरोबरच शरद पवार हे गावगाड्याकडे येत आहेत. त्यामुळे या सैतानापासून गावगाड्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.