विलासराव देशमुखांविषयीच्या त्या पोस्टला रितेशने दिले थेट उत्तर; तो म्हणाला...
नेटकऱ्यांकडून प्रसारीत करण्यात आलेल्या विलासराव देशमुखांच्या त्या पोस्टवर रितेश देशमुख यांनी थेट उत्तर दिले आहे.;
Latur News : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं नुकतच अनावरण लातूरमधील विलासराव सहकार कारखान्यात करण्यात आलं. या कार्यक्रमप्रसंगी बोलताना अभिनेता रितेश देशमुखला आपल्या वडिलांच्या आठवणीत अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. याचे अनेक छोटे-छोटे व्हिडीओ क्लिप सध्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. रितेशचा व्हिडीओ आपापल्या सोशल मिडियावरून शेअर करत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
अशातच विलासरावांबद्दल टीकात्मक एक्स पोस्ट शेअर करणाऱ्या एका नेटकऱ्याला रितेशने जशाच तसे उत्तर दिले आहे.
रितेश देशमुखने लातूरमधल्या कार्यक्रमात बोलताना,'विलासराव देशमुख हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते, काँग्रेस सोडणं त्यांच्या मनातही आलं नाही. असं विधान केलं होतं. अभिनेत्याच्या याच विधानावर एका एक्स हँडल वापरकर्त्याने पोस्ट शेअर केली आहे.
“विलासराव देशमुखांनी काँग्रेस सोडून विधानपरिषद निवडणुकीत सेना भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.” अशी एक्स पोस्ट एका युजरने केली आहे. यावर रितेशने “साफ खोटं! जा आणि आधी सत्य काय ते तपासून घ्या” असं जशास तसं उत्तर या नेटकऱ्याला दिलं आहे.