पश्चिम बंगाल: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पेट्रोल पंपावरील हॉर्डिंग्ज काढले जाणार आहेत. सध्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये आचार संहिता लागू केली असल्याने भारतीय निवडणूक आयोगाने ने बुधवारी सर्व पेट्रोल पंपावरील तसंच इतर एजन्सीजला पुढील 72 तासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो असलेले केंद्रीय योजनांचे होर्डिंग्ज काढण्याचे निर्देश दिले आहेत.
पश्चिम बंगाल च्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या (सीईओ) कार्यालयातील एका अधिकाऱ्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आदर्श आचार संहितेचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे.
या संदर्भात तृणमूल कॉंग्रेसच्या प्रतिनिधी मंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेऊन तक्रार केली होती.