तर माझीही सुरक्षा कमी करा: शरद पवार
राज्य सरकारच्या सुरक्षाधोरणाअंतर्गत मोठ्या नेत्यांची सुरक्षा कमी केल्यानंतर भाजपकडून राजकारण केल्याचा आरोप झाल्यानंतर आता खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन वेळ प्रसंगी माझी सुध्दा सुरक्षा कमी करा असं सांगितलं आहे.
राज्यातील बड्या नेत्यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून आता त्यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येणार आहे.
सुडबुद्धीने महाविकास आघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. सुरक्षेची गरज असताना सरकारने हा निर्णय घेतला आहे, असा आरोप भाजपचे नेते करत आहेत. याच पार्श्वभूमीवरून आता माझी सुरक्षा कमी करा, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन वेळ प्रसंगी माझी सुध्दा सुरक्षा कमी करा असं सांगितलं आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. फडणवीस यांच्या ताफ्यात असलेली बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असून राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. फडणवीस यांच्याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे.
सुरक्षेच्या कमी केल्यानंतर 'राज्यसरकारचा निर्णय दुर्दैवी,सुडाचं राजकारण करणारा आणि खोट्या मनोवृत्तीचा निर्णय आहे' ,असं मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी व्यक्त केले होतं.