गेल्या काही दिवसांपासून देशातील राजकारणाची पातळी घसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्याने भाजपला मतदान करणाऱ्यांना शाप दिल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी पुन्हा मिळाल्याने काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यातच काँग्रेसचे महासचिव रणदीपसिंह सुरजेवाला यांनी हरियाणामधील कैथल येथील उदयपूर किल्ला या ठिकाणी जन आक्रोश रॅलीचे आयोजन केले होते. यामध्ये बोलताना रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भाजपला मतदान करणाऱ्यांना शाप देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
काँग्रेसचे महासचिव रणदीपसिंह सुरजेवाला यांनी उदय सिंह किल्ल्यावरील जनआक्रोश मोर्चाला संबोधित करताना म्हटले की, जे भाजपला मतदान करत आहेत आणि भाजपचे जे समर्थक आहेत ते राक्षसी वृत्तीचे आहेत, असा मी महाभारताच्या भुमीतून शाप देतो.
रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठं वादंग निर्माण झाले आहे. त्यावर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी प्रतिक्रीया दिली आहे. यामध्ये मनोहरलाल खट्टर म्हणाले, राक्षसी प्रवृत्तीच्या कुटूंबात जन्मलेला व्यक्तीच अशा प्रकारे वक्तव्य करू शकतो.