#KisanMorchaराकेश टिकैत यांच्यावर हल्ला; दोन संघटना भिडल्या, एकमेकांवर खुर्च्या फेक

यशस्वी शेतकरी आंदोलनाचे (Farmer Protest) नेतृत्व करणारे भारतीय किसान संघटनेचे (bhartiya kisan union) नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांच्यावर शाही हल्ला झाल्याची घटना आज बेंगलुरु (bengaluru) येथे दुपारी घडली. पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी दोन संघटनांमधे एकमेकांवर भिडल्याने गोंधळ उडाला होता.;

Update: 2022-05-30 10:10 GMT


यशस्वी शेतकरी आंदोलनाचे (Farmer Protest) नेतृत्व करणारे भारतीय किसान संघटनेचे (bhartiya kisan union) नेते राकेश टिकैत (rakesh tikait) यांच्यावर शाही हल्ला झाल्याची घटना आज बेंगलुरु (bengaluru) येथे दुपारी घडली. पत्रकार परिषद सुरु असताना एका व्यक्तींने अचानकपणे राकेश टिकैत यांच्या चेहऱ्यावर शाई फेकल्याने गोंधळ उडाला. यावेळी दोन संघटनांमधे एकमेकांवर भिडल्याने गोंधळ उडाला होता.



राकेश टिकैत यांच्या समर्थकांनी संबधीत व्यक्तीला पकडले. दरम्यान त्याला मारहाण करण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एकमेकांवर खुर्च्या फेकल्याने गोंधळ उडाला होता. स्थानिक शेतकरी नेते चंद्रशेखर यांच्या समर्थंकाने टिकैत यांच्यावर शाई फेकली, असा आरोप टिकैत यांच्या समर्थकांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या दोन संघटनेतील कार्यकर्ते एकमेंकांना भिडल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर टिकैत यांना स्थानिक पोलिसांनी कुठलीही सुरक्षा पुरवली नाही. यावरुन टिकैत यांनी सरकारवर टिका केली. "भाजप सरकारच्या सांगण्यावरुन माझ्यावर हा हल्ला करण्यात आला," असा आरोप टिकैत यांनी केला आहे.

वर्षभरापूर्वी राकेश टिकैत यांच्या ताफ्यावर राजस्थान येथे हल्ला झाल्याची घटना घडली होती. राजस्थानमध्ये काही लोकांच्या गटाने हा हल्ला केला होता. टिकैत अलवरमधील हरसौरामध्ये एका सभेला संबोधित केल्यानंतर बानसूरला जात होते. यावेळी ततारपूरमध्ये घोळक्याने टिकैत यांच्या ताफ्यावर दगडफेक सुरु केली होती. या हल्ल्यामध्ये राकेश टिकैत यांच्या गाडीच्या काचा फुटल्या होत्या. या दरम्यान काही लोकांनी टिकैत यांच्यावर शाई फेकली. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत त्यांना घटनास्थळावरुन दूर नेले होते. पोलिसांच्या सुरक्षेत राकेश टिकैत यांना बानसूर येथे पोहोचवण्यात आले होते.

Tags:    

Similar News